एकदा तरी या ना

प्रिय आजोबा,
जर शक्‍य असेल तर तुम्ही आमच्यात पुन्हा यावे व आपले अनुभव आम्हाला सांगावे. आपली शिकवण आज सुद्धा मी आचरणात आणली आहे. अशीच शिकवण मिळावी ही ईच्छा

आपला नातू
अनिल
aniladya@gmail.com
—————-
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, आई कधी शक्‍य असेल तर स्वप्नात ये. मला तुझी खूप आठवण येते. तुझ्यासारखी फक्त तूच आहेस.
स्मिता/अंजली जोशी
smitavj@techmahindra.com
————
प्रिय रोहित,
तुझ्या आठवणी नेहमीच मनात राहतील. आजच्या जगात तुझ्यासारखा मित्र मिळणे खूप अवघड आहे. तू दिलेल्या प्रत्येक गोड आठवणींसाठी मी नेहमीच तुझी आभारी आहे. आयुष्यात मी कितीही पुढे गेले तरी तुला विसरू शकणार नाही. तुझ्या बद्दल बोलायला शब्दही कमी पडत आहेत आज. पण खरंच तुझी खूप आठवण येते मला.

तुझी मैत्रीण
गायत्री भालेराव
bhalerao.gayatri@gmail.com
———-
आई,
आमच्यावर तुझी अशीच कृपा असू देत.
अविनाश जयंत तन्नू
कॅलीफोर्निया
avinash.tannu@oracle.com
—————–
अण्णा,
तुम्ही अजून हवे होतात. आज तुम्ही असतात तर तुमचा रम्या कुठे आहे हे समजले असते. माझ्या लहान वयात तुम्ही मला सोडून गेलात तेव्हा आम्हाला काही समजत नव्हते. जेव्हा समजायला लागले तेव्हा तुमची कमी जाणवते आहे. अण्णा तुम्ही एकदा तरी या ना ! फक्त एकदाच

रमेश मोरे
merameshmore@gmail.com

1 comments

  1. प्रिय Gayatri,
    तुझ्या आठवणी नेहमीच मनात राहतील. आजच्या जगात तुझ्यासारखा मित्र मिळणे खूप अवघड आहे. तू दिलेल्या प्रत्येक गोड आठवणींसाठी मी नेहमीच तुझी आभारी आहे. आयुष्यात मी कितीही पुढे गेले तरी तुला विसरू शकणार नाही. तुझ्या बद्दल बोलायला शब्दही कमी पडत आहेत आज. पण खरंच तुझी खूप आठवण येते मला.

    Fakt tuzach
    Satish Jagtap
    satish.jagtap@gmail.com

यावर आपले मत नोंदवा