माझी मावशी….

 तिच्या विषयी लिहायला कुठून सुरुवात करावी हेच काळात नाहीये. आज तिला जावून ९ वर्षे झाली. पण मी तिला आजिबात विसरु शकले नाहीये. तिचा शांत आणि मनामिलावू स्वाभाव हेच तिचे वैशिष्ट्य.

तिचा कधीच कुणाशी वाद झ्याल्याचे मला तरी आठवत नाही. तिचे माझ्यावर खुप खुप प्रेम होते. मला एकाच मावशी होती, ती पण देवाने माझ्या पासून हिरावून घेतली. मी माझ्या मावशी ला कधीच विसरु शकत नाही.

आज सकाळ च्या निमित्ताने मला तिच्या आठवणी तुमच्या समोर मांडता आल्या त्या बद्दल मी सकाळ ची ऋणी आहे.

Vaishali

 vaishu_vg2004@yahoo.co.in

प्रिय काका

तुम्ही प्रसिद्‌ध आसामी ! तुमचं जीवन इतकं रंजक की पावशेर दुधात पाचशेर पाणी मिसळणं सोडा, महाग्रंथाच्या निर्मितीच्या भयानं तुमचं कर्तृत्व थोडक्‍यात लिहिणं हे आव्हानच! तुमचे चाहते अजूनही जगभर भेटतात. तुम्ही मुंबई-पुण्यात असततात तर तुमच्या किर्तीचा डिंडिम आभाळास भिडला असता. पण तुमचं बडोदाप्रेम प्रसिद्‌धीच्या तृष्णेहून अधिक जोरकस ठरलं..

टोरंटोच्या स्मिता भागवत यांनी जगावेगळे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या आपल्या “काका’ ंविषयीच्या आठवणी शब्दतर्पणच्या माध्यमातून जागविल्या आहेत. शब्दतर्पण ब्लॉगचा समारोप आपण या आगळ्या लेखाने करणार आहोत.

अधिक लेख वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा.

स्मिता भागवत, टोरंटो

smita_bhagwat@hotmail.com

Preeti

1996 Rathi hatyakanda. Kadachit tumhi visrun pan gele asal. Pan 7 nishpap lokanna tyanche pran gamvave lagle. Majha aayushyat zaleli pokli kadhich bharun nighnar nahi. 10 varsha rantr-n-divas bhetnara kutumba kshanat sodun gele. Majhi agdi javalchi maitrin Preeti mala sodun geli. Tila devane nahi pan mansane jagatun uthavla. Roj dashabhuja ganpati la jaycha program amhi aakhla hota.

Asa vatta ki mag devane ka karava asa? Ajunahi ti jashichya tashi majhya samor ubhi ahe. Kadhitari ekhadya chehryat disat aste. Ajunahi tichyabarobar mi goshti share karte. Pratyakshat ka nasena pan aaj pan ti majhya saglya goshi aaikun ghete ani mala halka vagta.
 
Tujhi pokli mi kadhi hi bharun shaknar nahi ani mi prayanta hi karnar nahi.
Purnima Deo

दादा

प्रिय दादा
कोटि कोटि सलाम तुमच्या कर्तुत्वाला अणि कोटि कोटि धन्यवाद् तुम्ही आम्हाला दिलेल्या मार्गदर्शना बद्दल व केलेल्या सौस्काराबद्ल.
तुम्ही आमचे आजोबा असूनही एका पित्यासराखी जवाबदारी तुम्ही पार पडली अणि आम्ही आज आमचे पायावर उभे आहोत.
आमचे जीवनात तुमचे किती महत्व आहे हे फक्त आम्हा भाउ व बहिनिनाच माहित आहे. 
तुमचे उपकार कितीही जन्म घेतले तरी फितु शकणार नाहीत.
तुमचा –
किरण शिंदे संगमनेर, रंजना चव्हाण नाशिक, माधुरी दिवाकर पुणे, धीरज शिंदे संगमनेर.

यश (sonu)

priy यश (sonu)

deenank ३० sept.roji yenara tuza १३ vaa vadhdivas tuzhe mammi pappa dukhad antakaranane nchukata sajara karnar aahet. sade saha varshapurvi deenank ४ मार्च २००२ roji कालाने  तुला amachyapasuun hiravun ghetalya divasapasun एक एक kshan tujhya घर bharlya athavaninvar amhi जगत aahot .

Sanjay Mane

parmeshwarachya krupene chotya यश chya rupane तू punha apalya ghari punarjanma ghetalya mule tuzhya mamma pappanche jagane sarthak jhale आहे
छोटा यश हा sagalya swayee tujhyach gheun ala आहे mhaununach tyala dekhil amhi tujhech naav dile आहे.
shale pasun ghara paryant sagalye जन chotya यश chya rupane tujhich athavan kadhat asatat

tari dekhil tujhi univ kadhich bharun nighanar नाही . amachya shevatchya shwasaparyant amhi तुला kadhihi visarnar नही

tujhech
Mammi/Pappa

माझे मेव्हणे

माझे मेव्हणे स्व. ती.. विठ्ठ्ल दामोदर तथा दादा जोग रहाणार सत्कोंडी पोस्ट सैतवडा तालुका व जिल्हा  रत्नागिरी. माझी पत्नी सौ. ज्योती जयंत चापेकर (पुर्वश्रमिची कुंदा दामोदर जोग) हिचे थोरले बंधू होत !

ती. स्व. दादा जोग यांचे वयाचे ८५ व्य वर्षी वार्धक्याने देहावसान झाले. ते त्यांची धाकटी मुलगी सौ. मीना तथा मेघना व जावई श्री. मनोहर बर्वे राहाणार अलीबाग यांचेघरी शनिवार दिनांक १६ अगस्त २००८ रोजी सकाळी निधन झाले. तो दिवस नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन असल्याने विशेषतः बहिणीना कायं लक्षात राहिल. तसेच जवालाचे नातेवाईक व आप्तेष्ठ यानाही धक्का होता. त्यांचा पश्चात् त्यांची पत्नी, ३ विवाहित मुली व जावाई, नातवंड, विवाहीत बहिणी व विवाहीत बंधू यांचा मोठा परिवार आहे.

तरुणपणी ते मुम्बई दिग्विजय मिलच्या ऑफिस मधे कामाला लागले. ४२ वयाचे असताना वडिल आजारी पडल्याने ते मुम्बईतील नोकरी सोडून त्यांच्या घरी सत्कोंडीला १९६६ मधे राहण्यास आले. १९७० मधे वडिलांचे वार्धक्याने दुखःद निधन झाले. त्यानंतर २ महिन्यानंतर ते नान्दिवडे जयगड़ येथील हाईस्कूल मधे अधीक्षक म्हणुन नोकरीस लागले. वयाचे ६० वर्ष १९८४ मधे पूर्ण झाल्याने व १२ वर्ष नोकरी
झाल्याने त्याना सेवानिवृतिवेतन मिळू लागले. धार्मिक महत्वाचे दिवशी ते गायनाचे किंवा कीर्तन करून धार्मिक व सामाजिक कार्य करू लागले. त्याची पुण्यातील विवाहित मुलगी सौ. विजया तथा अनुराधा व जावई श्री. श्रीनिवास गोखले व नातू वैभव व प्रणव, त्यांची दूसरी मुलगी पालशेत गावी राहणारी मुलगी सौ. शरयु व जावई श्री. आनंद ओक व नातू अमित व नाती अमृता व मधुरा आणि त्यांची तिसरी मुलगी
अलीबाग येथे राहाणारी सौ. मीना तथा मेघना व जावाई श्री. मनोहर बर्वे व नात मानसी व नातू मयुरेश या सर्वानी ती दादा जोग यांची शेवटची कही वर्ष त्यांच्या घरी आळीपाळीने ठेउन त्यांची सेवा व शुश्रूषा केली. ती. दादा जोग हे कायम उत्साही व हसतमुख असत व ते जिथे जातील तिथे त्यांच्या उपस्थित राहण्याने आनंद व वातावाणात जिवंतपणा आणत असत.. त्याना माझे शब्द-तर्पण

– श्री. जयंत रामचंद्र चापेकर

Pune, सध्या मुक्काम : San Jose, California, USA
 jayant_chapekar@yahoo.com

भागाई

तसं बघितलं तर भागाईचं या जगात कुणीही नव्हतं. नाही म्हणायला दोन-तीन बकऱ्या सोबतीला होत्या. मी प्रथम तिला बघितलं तेव्हा तिचे पहिले दर्शन खाष्ट म्हातारी असेच झाले.तिच्या खाष्टपणामागे दडलेली इतरांविषयीची काळजी आणि प्रेमळपणा लक्षात येण्याजोगे माझे वय नव्हते. 3री किंवा 4 थीत असेल मी! तरीही मी जरा तिच्यापासून फटकून आणि घाबरुनच राहत असे.

भागाईचे घर साधे मातीचे आणि धाबे असलेले असे होते. घराच्या पुढच्या दरवाज्याला एक छोटेसे फाटकही होते. आणि घरासमोरील जोतं इतक्‍या उंचीचं होतं की आम्हा लहान मुलांना त्यावरून चटकन उड्या मारता येऊ नये. आपल्या घराच्या उंबऱ्यात भागाई तिच्या समवयस्कांशी किंवा गल्लीतील बायकांशी बोलत बसलेली दिसे. या बाईचे व्यक्तिमत्व तसे साधेच. सुरकुतलेला चेहरा वय झाल्याचे व पूर्वीचे दिवस कष्टात गेल्याचे स्पष्ट दाखवित असे. दोन लुगड्यांच्या तुकड्यांपासून तयार केलेले ( दांड मारलेले) लुगडे भागाई नेसत असे. तिची गरिबी त्या फाटक्‍या कपड्यातून स्पष्ट डोकावून जात. भागाईला भागाई हे नाव कसे पडले किंवा तिचे मूळ नाव आडनांव काय हे माहित नाही परंतु लहानांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत सर्वच लोक तिला भागाई या नावानेच ओळखत असत.

तसा माझा आणि या भागाईचा संबंध फारच कमी येत असे. कारण एक तर ही म्हातारी अतिशय तोंडाळ होती. त्यामुळे ती कधी काय बोलेल ते सांगता येत नसे. त्यामुळे माझ्यासह माझे समवयस्क मित्र म्हातारीपासून जाणूनबुजून चार हात दूरच राहत असू. सुरुवातीला या म्हातारीविषयी आमची ही भावना होती. पण नंतर नंतर मात्र तिची बऱ्यापैकी ओळख की सवय झाल्याने तिच्याशी अधनंमधनं बोलणंही होत असे.

एकदा अशाच एका बोलण्यात तिने सांगितले की ती रहात असलेल्या त्या खेड्यातून जवळच असलेल्या नाशिकला उभ्या हयातीत कधी गेलीच नाही. पंचवटीतील काळाराम बघण्याची तिला फार इच्छा होती असे तिच्या बोलण्यातून जाणवले. आम्हाला मात्र नवल वाटले. एक व्यक्ति आपले सर्व आयुष्य एका गावात काढूच कसे शकते? याचे.

एकदा आम्ही चेंडू खेळत असताना तो नेमका भागाई राहात असलेल्या पाठीमागील अंगणात गेला. आता मोठा प्रश्‍न निर्माण झाला आमच्यापुढे. वाघाच्या गुहेत शिरायचे कोणी याचा! शेवटी हिय्या करुन मीच भागाईच्या घरात गेलो. दोन खणाचे लहानसे पण आतून व्यवस्थित शाकारलेले असे ते घर होते. लहानशा भिंतीने घराचे दोन भाग केलेले होते. बाहेरच्या भागात एक दोन शेळ्या घास खात होत्या आणि कोपऱ्यात एके ठिकाणी एक-दोन जुन्या गोधड्या आणि मळकट उशी इतक्‍याच वस्तू ठेवलेल्या होत्या.

दरवाजाच्या बाजूला एक काठी आणि एक प्लॅस्टिकच्या बुटांचा जोड ठेवलेला होता. पुरुषाच्या पायाचे ते बुट होते आणि पूर्वीच्या काळी आठवडे बाजारातून मिळायचे तसे ते पिवळसर लाल रंगाचे स्वस्त असे बूट होते. आतील खोल्यात एका कोनाड्यात एक पाळणेवजा देवघर आणि त्यात दोनचार दगड गोटे काही देवांचे टाक अशी सामुग्री होती. एखादी गाथा किंवा हरिपाठाचे पुस्तकही असावे. म्हातारी वारकरी होती. रोज बुक्का लावायची. अर्थात ती गंगा भागीरथी कधीच झालेली असावी. कारण ती तशी एकटीच होती. असो. शेवटी तो चेंडू मी मिळवला पण म्हातारीचे ते घर मात्र माझ्या कायमचे डोक्‍यात घर करून राहिले.

दिवस असेच जात राहिले. मीही आता 5 वी, सहावीत गेलो असेल. उन्हाळ्याच्या सुटीला नुकतीच सुरुवात झाली होती. दुपारची वेळ होती. मी घरात पलंगावर नुसताच लोळत पडलेलो होतो. दुपारी साडेबारा दीडच्या सुमारास बाहेर हातगाडी घेऊन भंगारवाला आला. सहज गंमत म्हणून मी त्याच्या हालचालींकडे आणि त्याच्याशी होणाऱ्या बाजूच्या लोकांच्या बोलाचालीकडे बघत होतो. इतक्‍यात समोरुन भागाई बाहेर आली तिच्या हातात काही वस्तू होत्या. भंगारवाल्याला त्या देवून काही चार आठ आणे मिळाले तर बरे हा त्यामागचा स्पष्ट उद्देश होता. एक दोन वस्तूंचे वजन झाल्यावर म्हातारीने एक बुटाचा जोड भंगारवाल्याला दिला. तोच जोड जो मी म्हातारीच्या घरी कोपऱ्यात पाहिला होता. आता मी जास्तच कुतुहलाने तिकडे पाहू लागलो. त्यांच्या बोलाचाली वाढायला लागल्या. भंगारवाल्याने बुटाचे आठ आणे द्यायचे कबूल केले. पण म्हातारी मात्र ऐकायला तयार नव्हती. ती जास्त पैसे मागत होती. किमान एक-दीड रुपया तरी असावा.

भंगारवाला भागाईच्या ओळखीचा असावा. शेवटी वैतागून म्हणाला “भागाई तुम्ही येवड्या का मागं लागता ? या जुन्या बुटाचे मी तरी किती देणार?’ त्याचे बोलणे ऐकले मात्र भागाईच्या चेहऱ्याचे रंग बदलत गेले. आवाज थोडा क्षीण झाला आणि काहीशा समजावणीच्या आणि काहीशा गदगदलेल्या स्वरात ती म्हणाली, भाऊ अरे ही माझ्या म्हाताऱ्याची शेवटची आठवणंय रे !

म्हातारीच्या या बोलण्याचा त्या भंगारवाल्यावर काय परिणाम झाला माहित नाही परंतु माझ्या काळजात मात्र चरर्र झाल्यासारखे वाटले. हा प्रसंग मनात कायमचा कोरला गेला. त्या दिवसापासून भागाईकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला. म्हणजे म्हातारीची परिस्थिती इतकी खालावली होती की नवऱ्याची प्रेमाने जपून ठेवलेली आठवण, त्याचे जोडे तिला अखेर भंगारवाल्याकडे विकायला काढावे लागले.

आजही हा प्रसंग मनात ताजा आहे. त्याकडे जेव्हा बघतो तेव्हा वाटते की गरिबांना आठवणी जपण्याचाही अधिकार आहे की नाही? वडिलांच्या बदलीमुळे मी सातवीत असताना ते गाव आम्हाला सोडावे लागले. त्यानंतर चार-पाच वर्षांनी त्या गावी पुन्हा जाण्याचा योग आला. भागाई राहात होती त्या घराकडे अवश्‍य गेलो. तिथे आता कुलूप होते. भागाई हयात होती की नव्हती कळाले नाही. पण त्या घराकडे बघताना भागाईचे तेच शब्द मात्र माझ्या मनात पुन्हा उफाळून आले, “”भाऊ अरे ही माझ्या म्हाताऱ्याची शेवटची आठवणंय रे !

 

पंकज प्र. जोशी

mr.pankajjoshi@gmail.com