बाबा, तुम्ही गेल्यानंतर चार दिवसाने जगात आलो…

(सत्यजीत विजय कहांडळ, एक दीड वर्षांचा मुलगा, जो आपल्या भावना व्यक्त करतोय त्याच्या वडिलांबद्दल, कै. विजय लक्ष्मण कहांडळ यांच्याबद्दल, की आज जे या जगात नाहीत.)

बाबा, मी तुमचा मुलगा सत्यजीत आहे. बाबा, तुम्हाला माहीत पण नसेल की तुम्हाला मुलगा झाला की मुलगी? तुम्ही गेल्यानंतर मी चार दिवसाने या जगात आलो. बाबा देव पण असा काय की ज्याने आपली भेट पण होऊ दिली नाही. मला बघितल्यावर तुम्हाला किती आनंद झाला असता…!

बाबा मी तुमच्यासारखाच आहे. तुमचा रोज फोटो बघतो, दर्शन घेतो. तुम्हाला माहिताय की तुमचे ते एम. डी. साहेब, श्री जगदाळेसाहेब यांनी तुमच्याबद्दल खूप काही सांगितले, केवळ एक महिन्यात तुम्ही किती स्थान मिळवले होते. त्यांचे शब्द नेहमीच माझ्या लक्षात राहतील आणि तेच मला खूप उपयोगी पडतील, त्यापासून मला प्रेरणा मिळेल. बाबा मी नेहमीच तुमच्यासारखाच बनण्याचा प्रयत्न करेल.

बाबा पहिले पाऊल तुमच्या हाताला धरून टाकायचे होते, पण ते माझ्या नशीबातच नव्हते. मी नेहमीच तुमची आठवण काढतो. बाबा माझे खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर. या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात तरी देव आपल्याबरोबर असा खेळ खेळणार नाही. पुढच्या जन्मात मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. घट्ट पकडून ठेवील. माझ्या जीवनात काय आहे हे मला माहीत नाही पण बाबा, मी तुम्हाला वचन देतो की मी नेहमीच खरे वागण्याचा प्रयत्न करेल. मोठ्यांचा आदर करेल.

तुमच्या आशिर्वादाची गरज आहे मला बाबा. मला आर्शिवाद द्या की जेणेकरून मी तुमचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करेल.

बाबा! रोज माझ्या स्वप्नात येत जा ना! मला छान, छान गोष्टी सांगत जा ना! मला फिरायला नेत जा ना! मला रोज रोज खाऊ आणत जा ना! बाबा, मी आता फक्त १-२ वर्षांचा आहे. मला खूप मोठे व्हायचे आहे, तुमच्या नावाने. तुमच्या नावासारखेच विजयी व्हायचे आहे मला. बाबा मला शक्ती द्या!

तुमच्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती दे!

सत्यजीत विजय कहांडळ
अमृतनगर, संगमनेर

“माझ्या प्रिय बाबांच्या आत्म्याला चिरशांती मिळो’ – सत्यजीत

“का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला?’ अंजू कहांडळ

“अशी पाखरे येती, स्मृती ठेवूनी जाती, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती ‘ – अण्णा- अक्का, ताई- तात्या, काकी- तात्या, दादा-जिजी, संजू, सचिन, सोनू, स्वाती, माधुरी आणि सर्व नातेवाईक.
anjalidhage82@rediffmail.com

13 comments

  1. Nakkich Satyajit, tujhya Babanche lakshya aahe tujhyakade. Aani tula “kaay karave” asa sambram padel teva te tujhya rastyatala diavahi hotil. Tyanchi univ koni bharoon kadhanar nahi. Tujhya sanvanala tar shabdahi tokade aahet re, pan tula olakhnarya aani na olakhnarya sagalyachya manahpoorvak shubhechchha satat tujhya barobar aahet. Tuhi motha zalyavar tuzi Aai aani aaji-aajobanna shabdanehi dukhavu nakos. Tyanchyavar kaay odhavale asel tyachi kalpanahi karane avaghad aahe. Dev tumha sagalyanchi kalaji ghevo aani anandache divas punha tumachya gharat yevot.

  2. Namaskar Satyajit. . .

    sharir he ek pratyek mansala labhlele bandhan aahe. . tuze baba ata sharirane jaroor tumachyat nastil pan te manane tar tumachyt nakkich aahe. .
    kunache jane va na jane aaplya hatat bhalehi nasel . . aaple baba aaplyat nahi mhanun udas hou nakos. . .sarvashi premane vag. . .mule hi aai vdilachyach rupat jagat asatat. . hanun evdhi khatri thev ki tuze baba suddha tuzyach rupat jagat aahe. .
    ya jagat prem aani vidya ya asya 2 goshti aahet ki jya dilyane mansachi bharbharathote. . paarmeshwar tula ya doghe goshti vtanyachi sarvotopari shakti devo. .

    Tuza bhau
    ABhi.

  3. Namaskar Satyajit. . .

    Devane Tuzyavar hi ji vel aanli aahe yacha artha assa pan asu shakto ki tuze pudhil aayushya adhik changle aani smaraniya honar asel tu tuzya vadilanpeksha khup khup motha aani kirtiman honar aahes tyasathi deo tuzi pariksha ghet aahe ase mala vatat aahe. jyana jyana aayushyan thecha khavya lagtat sankatana tond dyave lagte tyanache pudhil aayushya deo nakkicha changle banavto yavar maza vishawas aahe tevha tuzi kalji devala aahe tu phakta tyache smaran kar aani tuze sagli swapen puri hou de.

    Tuza

    Vilas R. Khare
    Pune

  4. माझी आई
    आई तुला माहीत आहे का आम्ही शाळेत आस्ताना तू गेलीस. पण त्या नंतर आपल्या घराचे घरपनच नाहीसे झाले. आता तुला गेल्याला
    ७ वर्षे झाली तरी तुझी उणीव आम्हाला जाणवते.आई तुला माहीत आहे का ग आता आपल्या जुन्या घराच्या जागी आम्ही नविन घर बनवले आहे. तुझी खुप इच्छा होती नविन घरात रहाण्याची पण त्या वेलेला आम्ही खुपच लहान होतो . आता आई तुला सुन पण आली आहे.आनी छोटासा नातू पण आला आहे.तुला माहीत आहे का ग आई तो तुज्या फोटोकडे पाहून लाडाने आजी – आजी बोलत आसतो
    तुझी खुप इच्छा होती की मला सुन असावी , माझी मुले खुप शीकावी आज ते सर्व आहे पण तू नाहीस ,का ग आई तू एकदा तरी आमच्यात ये ना . तू नसल्याने आमचे खुप नुक्सान होते ग .तू आमच्या साठी रोज कष्ट केले आनी आम्हाला शिकवले पण आज ते सुख पहनया साठी तूच नाहीस .आई तू एकदा तरी येना स्वप्नात.
    आनी भेट ना आम्हाला .

  5. hi Anju Tai.. Tu Daghe Gurujinchi mulagi ahes ka?

    ani tuzya misterancha acident Nimgaon Madhye zala hota ka?

    mala vataet tu tich asavi..

    kuthe astes? ani job?

    jar tuch asshil tar mala mail kar smdengale@gmail.com ver..

    me Santosh, Machhu mamancha mulaga… mala atavtay apan tumhi nitin chya thite rahat astana kehlyacho… atta kunich nahi thite Nitin/Ganesh/PrakashSachin Rode kunich nahiye ..me pan aata nasto thite…

    plz reply me tuzya mail chi vaat pahat ahe..
    je zale te ty abaadal apan kahi karu shakat nahi..
    etkya sundar shabdaat tu tuyza bhavan mandalys ki buss..
    plz reply me..jar tu mala olakhale asel tar..plz

  6. Dear Anju & Satyajit,
    Due to busy schedule could not read ur comment for days togather. Happened to read it today. Realised that my might have lost the oppertunity to read ‘Hrudayatil shabda’ if would not have read today too.
    Its indeed good that people like us got an opportunty to express. One needs to open up. For others the things become old. But one who loses ‘Atmiya’ loss is for ever. Ur touching letter proves it. Do not lose heart my dear. You have a loving child with u. To tuze pang fedel ashee asha thevlis tari aprxa matra thevu nakos. Karan apexexche oze vahan kajne far avghad aste. Na magitleli skha matra apsuk onjaLit visvtat.
    With love and blessings.
    Ur unseen Smita mavshee.

यावर आपले मत नोंदवा