तुझी फार आठवण येते आई!!!

आई तू जोपर्यंत होतीस, तोपर्यंत खूप कष्ट यातना स्वत: सहन करून घेतल्या पण आम्हाला कधी त्याचा अनुभव नाही घेऊन दिला. त्यावेळेस तुला फार टेन्शन यायचे पण आम्ही सांगायचो टेन्शन नको घेऊस, परंतु ती वेळ आता माझ्यावर आली तेव्हा कळले की तू एवढे असूनसुद्धा सर्व सहन केले.

आता आपल्या सोनीताईचे लग्न आहे, परंतु तू नाहीस याची खूप खंत वाटते. तू जरी आता झोपून असतीस तरी आम्हाला तुझा एकप्रकारचा आधार वाटला असता. पण आता तू या जगात नाहीस. माझ्या मनातील ही पोकळी कोणीही भरून काढू शकणार नाही. तुझी फार फार आठवण येते आई !!

तुझा,
सागर

सागर लोळगे.
sagar_lolage@yahoo.co.in

यावर आपले मत नोंदवा