माझे पप्पा…..

प्रत्येकावर आपल्या प्रिय व्यक्तीला गमावान्याची वेळ येते. पण मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझे …पप्पा मला असे अचानक सोडून जातील तेही अशा ठिकाणी जिथून आजपर्यंत कोणीच परत आले नाही. कधी कोना दुसर्यावर अशी वेळ आली तर असे वाटते काय करतील ते लोक कसे जगतील पप्पा शिवाय ?

पण छे हे तर माझ्याच बाबतीत घडले रे देवा, काय करू ? आम्हाला त्यांच्याशिवाय जगण्याची इच्छाच होत नाहीये. असे वाटते कुठल्यातरी पधतीने देवाने निदान त्यांच्याशी एकदा तरी संपर्क करण्याचा मार्ग ठेवावा. पप्पा …उद्या तिथिप्रमाने तुम्हाला एक वर्ष होइल. कुठे आहात तुम्ही? आमच्या बरोबरच आहात ना…. सांगा ना …सतत बोलत राहणारे तुम्ही….आता एवढे शांत कसे झालात ? आई तुमच्या शिवाय पूर्ण कोलमडून गेली आहे. निदान एकदा तरी आम्हाला भेटायला या ……याल ना पप्पा …देव तुमच्या आत्म्याला सद्देव शान्ति देवो ….

तुमची लाडकी
माधवी

madvi78@yahoo.com

यावर आपले मत नोंदवा