माझ्या अनेक अनोळखी मित्रांना

माझे हे शब्दतर्पण माझ्या कुठल्याही परिचितांबद्दल नसून ज्या अनेक अनोळखी मित्रांनी विशेष करून आय.टी. क्षेत्रातल्या, आपली जीवनयात्रा ऐन तरुण वयात स्वत: संपवली, त्यांच्याबद्दल आहे. मला हे कधीच कळले नाही की त्यांना जीवनरूपी प्रोजेक्‍टस्‌ची “डेडलाईन’ गाठण्याची इतकी काय घाई झाली होती की त्यांना त्या कामाच्या दबावाखाली स्वत:च “डेड’ व्हावे लागले?

त्यांना जुना जाणता, सरळ साधा मंत्र- सर सलामत तो पगडी पचास – कधीच का समजला नाही?
मकरंद पुंडलिक

makarand@rediffmail.com

2 comments

यावर आपले मत नोंदवा