बाबा, तुम्ही आमच्यासाठीच जगलात

माझी माझ्या वडिलांना भावपूर्ण श्रद्‌धांजली ! आज बाबा जाऊन १२ वर्ष झाली, तरी अजून आई त्यांना जरा सुद्धा विसरली नाही.. आणि ना ही आम्ही चौघे. आम्हाला माहिताय की आज आम्ही आयुष्यात जे काही पुढे आलो ते तुमच्या सदैव पाठीशी असणाऱ्या आशिर्वादामुळे.

तुम्ही आम्हाला स्वावलंबी जगावं असंच नेहमी सांगितलंत आणि आम्ही तसंच जगत आहोत. तरी जेव्हा दादा यू.के.ला पहिल्यांदा गेला, तेव्हा वाटलं की तुम्ही असायला पाहिजे होतात. किंवा दादाचे लग्न, आपल्या घरातील पहिली नात, माझे लग्न अशा सगळ्याच लहान मोठ्या आनंदात तुमची आठवण येते आणि ती येतच राहणार. वाईट यासाठी वाटतंय की तुम्ही फक्त आमच्यासाठीच जगलात आणि जेव्हा केव्हा तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळाला, तेव्हा तुम्हीच नाही राहिलात. आई म्हणते तेच खरे,”कष्ट घेतले तुम्ही, सुखी झालो आम्ही’

क्षितिजा के.
kshiloves@gmail.com

यावर आपले मत नोंदवा