दाटून कंठ येतो…..

माझी भाची सौ. वैदेही पटवर्धन (पुर्वाश्रमीची रजनी गद्रे , माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी) रहाणार शाहपुर (जिल्हा  ठाणे) ही वयाच्या ४४ व्या वर्षी चार दिवसांच्या दुखाण्याचेनिमित्त होउन देवाघरी गेली. गेल्या वर्षी (२० सप्टेम्बर , २००७)  गौरी विसर्जनाच्या दिवशी आमची ही गौरही कायमची निघुन गेली. शांत, प्रेमळ, हसतमुख व कामसू अश्या रजनीची मोठी मुलगी तेव्हा CS करत होती आणी मुलगा  दहावीत गेला होता.

यंदा जून मध्ये त्याचा रिझल्ट लागला आणि त्याला ९०% मार्क्स मिळाले. आई गेली तरी अभ्यास करुन त्याने एव्हढे यश मिळ्वले हे त्याचे मोठेच कौतुक आहे पण माझे मन तळमळ्ते की त्याचे हे यश पहायला त्याची आई नाही. डोळ्यातल्या आसवानीच स्व. रजनीला हे शब्दतर्पण !

सौ. ज्योती जयंत चापेकर
jayant_chapekar@yahoo.com

यावर आपले मत नोंदवा