माझी आजी – कर्तृत्व डॉट कॉम

श्रीमती सुशिलाबाई  नागेश गोहाड = कर्तृत्व डॉट कॉम.  म्हणजे माझी आजी , एक सळसळते व्यक्तिमत्व. 

            आजीबद्दल बोलायचे म्हणजे, तिने आम्हा सर्वांना घडवले  ते तिच्या संस्कारांनी  आणि तिने वेळोवेळी दिलेल्या उपदेशांनीच.  माझे आजोबा खूप लवकर गेल्यामुळे पुढचा संसार तिने एकटीने तिच्या वयाच्या ८३व्या वर्षापर्यंत केला.

            आजीचे गुण वर्णन करायचे म्हणजे  हुशार, कर्तबगार, धीट, सुगरण,  नीटनेटकेपणा असे एक नाही अनेक. आजीला आदर्श माता म्हणुन पारखे पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

           आजीने मला माझ्या लग्नानंतरचे पाहिले अधिक वाण  ३३ म्हैसुरपाकाचे दिले होते, ते सुद्धा तिने स्वतः घरी केलेल्या. तिने केलेल्या नुसत्या फोडणीचा सुद्धा  घमघमाट सुटायचा.

            तिच्या धीटपणाची कमाल म्हणजे,  काही वर्षापूर्वी तिची सोन्याची चेन चोरीला गेली होती. पण तिने त्याचा पाठपुरावा करून ती मिळवली. केवळ ग्रेट. ती सर्व जगभर फिरली होती. कधी सोबत असायची तर कधी एकटी पण कायम गुरुनाथ ट्रव्हल कंपनीबरोबरच जायची.

तिच्या वयाच्या  पंच्याहत्तराव्या वर्षी तिने पैराग्लायाडिंग केले होते. तिचा त्या वयातील उत्साह पाहून सर्वजण थक्क झाले होते त्यामुळे तिच्याकडून पैसे पण घेतले नाहीत. आजी तिच्या कोणत्याही मुलाच्या आणि नातवंडाच्या गाडीवर पाठीमागे  बिनधास्तपणे बसायची

   

आजीचा बटवा म्हणतात तो ही तिच्याकडे होताच. कुठल्याही प्रसंगाला ती बरोबर मार्गदर्शन करायची. कोणत्याही समस्येवर तिच्याकडे रामबाण उपाय असायचाच. ती कायम म्हणायची की माणसाने आपल्या जीवाला जपले पाहिजे. या तिच्या वाक्याचा अर्थ तेव्हा लक्षात आला नव्हता जो की आता क्षणाक्षणाला त्याचा प्रत्यय येतो.

            आज आजी जाऊन दोन वर्षे होतील पण आजही घरातल्या प्रत्येक प्रसंगाला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

            नेट वरून सकाळ चे सदर बघितले आणि मला लिहावेसे वाटले त्याबद्दल मी सकाळ ची आभारी आहे.          

 

आम्हा सर्वांतर्फे आजीला भावपूर्ण श्रद्धांजलि

 

 

सौ नीता विष्णु लागु

aruna_lagu@yahoo.com

2 comments

  1. Chhaan! Ajjibaddal lihayche tar panachya pana apuri padtil.Tichya sahawasat alelya sarvach lokanna tichya wyaktimatwache anek pailu pahayla milale astil. Ti kharach khup great hoti.Ajunahi gharatlya samarambhanmadhe asa bhaas hot rahato ki ti kopryatlayach ekhadya khurchiwar basli ahe ani laksha theun ahe.

यावर आपले मत नोंदवा